कोणत्या प्रकारच्या इक्विटी फंडमध्ये सर्वात कमी आणि कोणत्या इक्विटी फंडमध्ये सर्वात अधिक जोखीम असते?

कुठल्या प्रकारच्या इक्विटी फंडमध्ये सर्वात कमी आणि कुठल्या इक्विटी फंडमध्ये सर्वात अधिक जोखीम असते?

म्युच्युअल फंड सही आहे?

त्यांच्या वर्गीकरणावर आणि त्यामुळे त्यांतील पोर्टफोलिओवर अवलंबून म्युच्युअल फंडमधील जोखीम अनेक बाबींवर अवलंबून असू शकते. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील जोखीम अनेक प्रकारची असते पण सर्वात महत्त्वाची म्हणजे मार्केटची जोखीम. इक्विटी या वर्गातील असल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड्सना "हाय रिस्क" म्हणजे अधिक जोखीम असलेली गुंतवणूक समजले जाते. तसे पाहिल्यास सर्व इक्विटी फंड्ससाठी मार्केटची जोखीम असतेच, पण ती जोखीम इक्विटी फंडच्या प्रकारावर अवलंबून प्रत्येक फंडसाठी कमी-अधिक असू शकते.

लार्ज कॅप फंड्समध्ये जोखीम सर्वात कमी असते असे समजले जाते कारण ते लार्ज कॅप कंपनींच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात, म्हणजेच अशा मोठ्या कंपनींच्या स्टॉक्समध्ये ज्यांचा चांगला जम बसलेला आहे आणि हे स्टॉक्स मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनींच्या स्टॉक्सपेक्षा अधिक सुरक्षित समजले जातात. कमी जोखीम असलेले इक्विटी म्युच्युअल फंड साधारणपणे चांगले डायव्हर्सिफिकेशन असलेला पोर्टफोलिओ बाळगतात ज्यात लार्ज कॅपच्या अनेक सेक्टरचा समावेश असतो. इंडेक्स फंड आणि मोठ्या मार्केट इंडेक्सवर आधारलेले ईटीएफ जे अक्रिय(पॅसिव्ह) धोरणाचा अवलंब करतात त्यांची जोखीम सुद्धा कमी आहे असे समजले जाते कारण त्यांचे मार्केट इंडेक्स चांगले डायव्हर्सिफाइड असतात.

याच्या विपरीत फोकस फंड, सेक्टोरल फंड आणि थीमॅटिक फंड असतात कारण त्यांतील पोर्टफोलिओमध्ये काहीच कंपनींचे स्टॉक्स असतात. अधिक जोखीम असलेल्या इक्विटी फंड्समध्ये एकवटलेली जोखीम असते कारण त्यांतील स्टॉक्स फक्त एक किंवा दोन सेक्टर्सपर्यंत मर्यादित असतात. फोकस फंड जरी मोठ्या आणि चांगला जम बसलेल्या कंपनींच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करीत असले तरीही त्यांत साधारणपणे फक्त 25-30 स्टॉक्स असतात ज्यामुळे जोखीम एकवटते. जर फंड व्यवस्थापकाचा अंदाज योग्य ठरला, तर त्यातील परतावा एखाद्या डायव्हर्सिफाइड लार्ज कॅप फंडपेक्षा अधिक असू शकतो, पण याच्या उलट सुद्धा होऊ शकते.

सेक्टोरल फंड एकाच सेक्टरच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात जसे ऑटो, एफएमसीजी किंवा आयटी आणि त्यामुळे त्यांत फार अधिक जोखीम असते कारण संपूर्ण उद्योगावर विपरीत प्रभाव टाकणारी एखादी घटना झाल्याने त्यांच्या पोर्टफोलिओमधील सर्व स्टॉक्सवर त्याचा प्रभाव पडतो. थीमॅटिक फंड अशा उद्योगांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात ज्यांचे काम आपसात संबंधित असते आणि सध्या त्यांत तेजी आहे पण दीर्घकाळामध्ये ही परिस्थिती बदलू शकते.

गुंतवणूकदारांना वाटते की इतर फंड्सपेक्षा इक्विटी फंड्सचा परतावा अधिक असतो, पण त्यांनी याचेही लक्ष ठेवले पाहिजे की सर्व इक्विटी फंड एकसारखे नसतात. परताव्याची शक्यता त्यांच्या इक्विटी फंड जोखीम प्रोफाइल प्रमाणे असते. त्यामुळे कुठल्याही फंडच्या अनेक सेक्टरमधील डायव्हर्सिफिकेशनकडे लक्ष द्या आणि त्यांच्या पोर्टफोलिओ मधील मुख्य स्टॉक्स पहा ज्यामुळे आपल्याला त्यातील एकत्रित जोखीम कळेल आणि आपण गुंतवणूक करण्याआधी योग्य निर्णय घेऊ शकाल. फंड्सकडे फक्त कमी जोखीम किंवा अधिक परतावा या दृष्टीनेच न बघता आपल्याला अशा फंडच्या शोधात असले पाहिजे ज्याच्या जोखमीची पातळी आपल्यासाठी योग्य असेल.

453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे